स्वातंत्र्य..?

 या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी अनेक ठिकाणी अस ऐकलं की इंग्रजांनी आपला देश लुटून नेला ...

 सोने-चांदी वगैरे आणि तो जगातील मौल्यवान हिरा कोहिनूर सुध्धा ...


पण मला आज असे म्हणावेसे वाटते की...



अरे! त्या निर्जीव कोहिनूर ची गरज काय...

आमच्याकडे सजीव कोहिनूर होते  , 

वीर होते ते शुर होते , 

भारतमातेचे कोहिनूर होते...


भगतसिंगासारखे देशभक्त होते, 

भारतमातेचे सळसळते रक्त होते.

गांधीजींसारखे अहिंसक होते, 

टिळकांसारखे अन्यायविरोधक होते,

आंबेडकरांसारखे ज्ञानशूर होते ...

 वीर होते ते शुर होते , 

भारतमातेचे कोहिनूर होते...


देशहितासाठी सर्वस्व लावणारे ,

स्वातंत्र्यासाठी मृत्यूलाही कवटळणारे ,

स्वाभिमानासाठी समर्पण धुडकावून

हसत हसत स्वताला संपवणारे...

वीर होते ते शुर होते ,

भारतमातेचे कोहिनूर होते.


रक्ताने माखलय हो आजच आपल स्वातंत्र्य,

कोणी तुरुंगात संपवलय आपल्यासाठी तारुण्य,

कोणी झेलल्यात गोळ्या निधड्या छातीवर 

ज्यांच्या बलिदानाने झालिये ही माती धन्य...


अन्याय डोळ्यादेखत पाहता 

पेटून उठल्या राणी लक्ष्मीबाई,

हाती तलवार , पाठी राजकुमार

 घेऊन केली इंग्रजांवर चढाई

तात्या टोपेंच्या पराक्रमाने 

इंग्रजी तख्त हादरले होते ...

वीर होते ते शुर होते ,

भारतमातेचे कोहिनूर होते ...


अश्या या क्रांतीवीरांच्या देशात आपण राहतो 

देशाला स्वातंत्र्य मिळन 77 वर्ष झाली खरी

 पण स्वांतत्र्य !!! 

स्वातंत्र्य भेटले का आपल्याला ...???


अहो गेले ते इंग्रज आणि त्यांची ती जाचक करनियमावली

पण आला तो भ्रष्टाचार आणि धर्म जातीय दंगली

गेले ते इंग्रज आणि त्यांचे ते तोडीमोडीचे शासन 

पण पाहतोय देश जगाच्या पोशिंद्याचे रस्त्यावर उपोषण

गेले ते इंग्रज ज्यांनी केली लूट केले देशाचे शोषण 

पण आज दिसतेय देशात लोकशाहीविरोधी राजकारण

गेले ओ ते इंग्रज भेटले देशाला स्वातंत्र्य 

पण आता सोसतोय देश दहशतवादी षड्यंत्र

गेले ते इंग्रज आणि त्यांचे ते नियम कानून विचित्र

पण पाहतोय मतदार आयाराम गयाराम च चित्र....


                        ..... गणेश दरोडे.










Comments

Popular posts from this blog

रोने की कला...

अंतः अस्ती प्रारंभ |

प्रीति...