कविता काय असते....
कविता काय असते ...?
भावना अनावर झाल्या की अश्रू येतात, आहे असं ऐकून...
तशीच कविता अवतरते भावनांच्या दरीतून ...
उंच उंच उडवते सोडवते ती मनाच्या बंधनातून ...
तिला काही कळतंय,
भाषा-व्याकरण-सभ्यता ...
तिला काय कळतंय,
धर्म-विज्ञान-सत्यता ...
तिला काय कळतंय,
रूढी-परंपरा-व्यवस्था ...
विद्रोही स्वभावाची ती हे
सगळं सामावते कविता...
त ला त , प ला प जोडून
बनते का कधी पद्य ...
यमक जुळले तरी ,
अनुपस्थित असते कवितेचे मद्य...
वाचली की वाचणाऱ्याचे पाऊल
इकडे तिकडे पडली पाहिजेत...
रडणारे हसले पाहिजेत,
हसणारे रडले पाहिजेत...
कवीचे नाव देता कवितेला
काव्य तिचे संपते , मृत पावते...
कविता ना सूचते , ना बनते
ती तर आकाशातून अवतरते ....
जसे अवतरले वेद,पुराण,बायबल,कुराण
कवीच्या अनुपस्थितीत कविताच कवी बनते.....
....... गणेश दरोडे
Comments
Post a Comment