ती....
ती....
मी वेडा दगडामध्ये अमृताचा थेंब शोधत होतो...
किती वेडा ! संसारामध्ये दैविय प्रेम शोधत होतो...
कृष्ण- मिरा, हिर- रानझा, लैला- मजनू होतो मी ऐकून....
शोधले, शोधले खूप शोधले हाती आले वासनांचे ढेकूण...
एकूण गोष्ट अशी की दाखवून पीठ आत मध्ये काटा असतो .....
वेड्या मत्साला काय माहित मोहामुळे त्याचा काटा बसतो ....
पाहिले पाखडून खूप धान्य फक्त खडेच निघाले...
तन-मोहीत मन-संकुचित सर्व वेडेच निघाले ...
निराश् मनाने जेव्हा मी विरक्त झालो ...
हताश रुद्ययाने जेव्हा मी अशक्त झालो ...
पळालो मायेच्या माया नदीपासून दूर ,पळणे खोटे होते
कळाले जेव्हा एका निरागस झऱ्याला भेटलो....
हसलो माझ्या येडेपनावर ,पुन्हा प्रेम अवस्थेत आलो...
पितो आता रोज तेच लोट प्रेमाचे...
दर्शन होतात मला माझ्या प्रिय परमात्माचे...
तिला माहिती नसेल कदाचित तिच्या प्रेमाने मला मुक्ती भेटली ...
जणांना अशक्य साधनेतून मला सहज ती परमशक्ती भेटली....💗❤🔥
. .......Ganesh darode
👍👍👍
ReplyDelete