मन शेखचिल्ली आहे....
मन शेख चिल्ली आहे ...
शेख चिल्ली झुक झुक गाडीत प्रवास करत होता ...
एक नवयुवक तिथेच आजूबाजूस फिरत होता...
तो म्हणाला शैखचिल्ली ला वाजले किती,
शेखचिल्ली मात्र वाटली त्याची भीती...
मौन व्रत धारण करत बुद्धांच्या प्रतिमेप्रमाणे स्तब्ध झाले...
खूप वेळ, वेळ विचारत नवयुवकाचे शब्द सुद्धा निशब्द झाले....
चिडून तो म्हणाला सांगा ना किती वाजले ...
शेखचिल्लीने हळू आवाजात म्हटले, पाच वाजले .
नवयुवक म्हटला ,
वेळ तर होतो विचारत एवढा वेळ का लावला सांगायला ,
शेखचिल्ली म्हणाले तुला नाही जमत का घड्याळ वागवायला,
तो म्हणाला नाहीये म्हणूनच विचारलं ना
तुमचं काय गेलं पाच वाजले म्हणायला
शेखचिल्ली गालावर खळी आनत म्हणाला .....
इथेच गोष्ट कधी थांबत नाही
मी म्हणणार पाच वाजले, तू म्हनणार कुठे
राहता...... मी म्हणणार मुंबई ,
तू म्हणणार चाललोय साई , मुंबईलाच मी
मी म्हणणार ये मग कधी आमच्या घरी ,
माझ्या घरी आहे माझी लाडकी परी...
तू जेव्हा घरी येशील, तिला पाहशील,
तिच्याशी बोलशील ,सिनेमा पाहायला नेशील,
काही दिवसात लग्नाचा प्रस्ताव घेऊन येशील
पण मी आत्ताच सांगतो ...
ज्याच्याकडे घड्याळ सुद्धा नाही
मी त्याला माझी मुलगी देणार नाही
शिखचिल्ली वर आपले मन हसते
पण आपले मन पण असेच तर असते ,
नाही ते विचार करते, कल्पनेत रमते ,
शहाण्याला येडं आणि येड्याला शहाणे बनवते...
थोडक्यात काय तर आपले मन पण शेखचिल्लीच असते......
.....Ganesh darode
Comments
Post a Comment