येड्या जाग आता...

 येड्या जाग आता ...


आकाशाला मर्यादा असतील , दिसत नसतील ,तरी असतील


दिसतील भ्रमरूपाने क्षितिजासरिखे , शोधशील तर स्वतः हरवशिल...


दैविय सत्याच्या शोधात चार भिंतीत गुरफटशील ...


 तर बुध्दी सोबत अस्मिताहि गमावशिल...


मरशिल, तडफडशिल ,व्याकूळ होशील, रडशील...

येता जागरण अनंत पटीने हसशील ....


अस्तित्व तुझे आहे काय.. 

स्वताला काय समजतो तू वेड्या ..

कामना, भावना, वासना, आभूषण नव्हे असे बेड्या...


विहंग आहे तू आकाशाचा निळा रंग तुला बोलवतोय...


तू दंग आहे आज एवढे कमवले उद्या किती कमावतोय.....


अमृताचा झरा सदोदित वाहतोय ,


आणि येड्या तू सोपे मरण शोधतोय...


समजशील जेव्हा तू प्रेम प्रेमिंचे , कर्म अकर्त्याचे, मर्म सत्याचे ,


पाहशील तेव्हा सक्षित्व साक्षीचे , परमतत्व परमात्म्याचे ,शिवत्व शिवाचे, शुण्यत्व शून्याचे...


      ..... गणेश दरोडे

     

Comments

Popular posts from this blog

रोने की कला...

अंतः अस्ती प्रारंभ |

प्रीति...