अस्तित्वाचा वेद...
आजच्या कवितेचा आशय भाष्य अभाष्य यांची पराकाष्ठा आहे .... तो अनंत परमेश्वर कसे नाटकीय खेल रचतो, आणी खोड्या करणारया नटखट मुलासारखा लपुन बसतो , अश्या या परमेश्वराला , `मि कोण आहे?` या प्रश्नाच्या सहाय्यने शोधायाचे आहे....कवितेचे शीर्षक आहे...अस्तित्वाचा वेद, वेद म्हणजे जानने किवा जानन्याची क्षमता.... अस्तित्वाचा वेद.... सप्तरंग पसरवत फिरतो तो करुणामयि सूर्य उदयास येता... विहंग पाहणाऱ्याला दाखवत असतो , किरणांमधील बायबल कुराण वेद गीता ... अबोल गीत त्याचे अज्ञानी पशुपक्षी धुंद होऊनी गातात.... अचल अढळ वृक्ष सुद्धा त्याच्या प्रकाशामध्ये चिंब न्हावूनी जातात.... तृण ते मोत्यांनी सजलेले, सूर्याचा थेंब थेंब पिऊनी घेतात... लाल लालिमा पसरवत ते दानशूर सूर्यदेवता अस्तित्व वेद गाऊनी जातात ... हे काव्य अस्तित्वाचे, अस्तित्वाचाही आधीचे, लय,ताल,सूर, छंद सोबत घेऊन चालि जे... कणाकणामध्ये बसलेले असे दडून ते शून्य आणि अनंत... शुभ्र रंगांमध्ये वसलेले असे जसे असंख्य रंग... शून्य...