स्वातंत्र्य..?
या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी अनेक ठिकाणी अस ऐकलं की इंग्रजांनी आपला देश लुटून नेला ... सोने-चांदी वगैरे आणि तो जगातील मौल्यवान हिरा कोहिनूर सुध्धा ... पण मला आज असे म्हणावेसे वाटते की... अरे! त्या निर्जीव कोहिनूर ची गरज काय... आमच्याकडे सजीव कोहिनूर होते , वीर होते ते शुर होते , भारतमातेचे कोहिनूर होते... भगतसिंगासारखे देशभक्त होते, भारतमातेचे सळसळते रक्त होते. गांधीजींसारखे अहिंसक होते, टिळकांसारखे अन्यायविरोधक होते, आंबेडकरांसारखे ज्ञानशूर होते ... वीर होते ते शुर होते , भारतमातेचे कोहिनूर होते... देशहितासाठी सर्वस्व लावणारे , स्वातंत्र्यासाठी मृत्यूलाही कवटळणारे , स्वाभिमानासाठी समर्पण धुडकावून हसत हसत स्वताला संपवणारे... वीर होते ते शुर होते , भारतमातेचे कोहिनूर होते. रक्ताने माखलय हो आजच आपल स्वातंत्र्य, कोणी तुरुंगात संपवलय आपल्यासाठी तारुण्य, कोणी झेलल्यात गोळ्या निधड्या छातीवर ज्यांच्या बलिदानाने झालिये ही माती धन्य... अन्याय डोळ्यादेखत पाहता पेटून उठल्या राणी लक्ष्मीबाई, हाती तलवार , पाठी राजकुमार घेऊन केल...